
पाऊस पडूनही बळिराजा दुःखातच! आठ लाख हेक्टरातली पिकं पाण्यात
मान्सूनमुळे यंदा बळिराजाला मोठा फटका बसला आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातली आठ लाख हेक्टरमधली उभी पिकं मातीमोल झाली आहे. हे नुकसान केवळ काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर आगामी काळात आणखी जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: पश्चिम महाराष्ट्रात जोर गावात सर्वधिक ३७११ मिलिमीटर पाऊस
कृषी विभागाने याविषयीची माहिती प्रसिद्ध केली आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातली तब्बल आठ लाख हेक्टरातली पिकं अक्षरशः पाण्यात गेली आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात पुढच्या सात दिवसांमध्ये हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.
हेही वाचा: Nanded Heavy Rain : अतिवृष्टी, पुरामुळे पिकांचे, रस्त्यांचे नुकसान
पूरग्रस्त जिल्हे आणि तालुक्यांमध्ये शेतांचं, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप झाल्याचीही शक्यता आहे. यंदाच्या वर्षी १५२ लाख हेक्टरमध्ये खरीपाची पेरणी झाल्याचा अंदाज आहे. जूनमध्ये मान्सून आला, मात्र नियमित पाऊस नव्हता. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात यायला खूप वेळ लागला. या काळात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी न कऱण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात तर पडला. मात्र पेरणीनंतर आलेला धुवाँधार पाऊस आणि पुरामुळे पिकं अक्षरशः पाण्यात गेली.
Web Title: Maharashtra Standing Crop On Eight Lakh Hectares Damaged Due To Heavy Rains
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..