

Maharashtra Board New Exam Rules
ESakal
फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांबद्दल विद्यार्थी आधीच चिंतेत आहेत. दुसऱ्या सत्राचे वर्ग ७ नोव्हेंबरपासून सुरू झाले. परीक्षा जवळ येताच विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता वाढत आहे. पण आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या वर्षी अनुत्तीर्ण होणे जवळजवळ अशक्य आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाच्या परीक्षेची भीती सोडून द्यावी आणि ताणतणाव टाळावा असे आवाहन केले आहे.