ऑनलाईन शिक्षण होणार आणखी सोपं; YouTube आणि JioTv वर शैक्षणिक चॅनल्स सुरु

सुमित बागुल
Friday, 24 July 2020

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता १ ली ते इयत्ता १० वीच्या मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ४ नवीन YouTube चॅनल सुरु केले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता १ ली ते इयत्ता १० वीच्या मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ४ नवीन YouTube चॅनल सुरु केले आहेत. सोबतच इयत्ता ३ री ते इयत्ता १२ वी साठी आता जिओ टी.व्ही वर एकूण १२ नवीन चॅनल्स सुरु करण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे ज्याने ४ माध्यमांमध्ये शैक्षणिक Channel सुरु केले आहेत. स्वतः वर्ष गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. सध्या मराठी आणि उर्दूमध्ये या दोन भाषांमध्ये या चॅनल्सच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. येत्या काळात इंग्रजी आणि हिंदीमध्येदेखील अशा प्रकारचे चॅनल्स येणार आहेत.  

मोठी बातमी - लॉकडाऊन काळात खाण्याचे ट्रेंड बदलले; 'या' पदार्थांची मागणी घटली, तर 'यांची' वाढली..

 

शालेय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून झालंय. शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.या सूचनांप्रमाणे यापुढे केजी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन  वर्ग होणार आहेत. केजीच्या विद्यार्थांचे दररोज 30 मिनीटे वर्ग घेण्यात येणार आहे. यामध्ये पालकांशी संवाद, मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

मोठी बातमी -  "व्यंकय्या नायडूंनी माफी मागावी, अन्यथा मुंबईत पाऊल ठेऊ देणार नाही"; शिवसेनेतील 'कुणी' दिलाय हा निर्वाणीचा इशारा...

पहिली ते दुसरीची 30 मिनीटांची दोन सत्रे होणार आहेत. यामध्ये पालकांशी संवाद, ऍक्टिव्हिटी बेस शिक्षण देण्याची सूचना करण्यात आली आहे. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थांची 45 मिनीटांची दोन सत्रे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नववी ते बारावीची 45 मिनीटांची चार सत्रे ऑनलाईन घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

Maharashtra State Council for Educational Research launched four YouTube channels varsha gaikwad


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra State Council for Educational Research launched four YouTube channels varsha gaikwad