esakal | राज्याला तीन मुख्यमंत्री; पण स्टेअरिंग अजित पवारांकडे
sakal

बोलून बातमी शोधा

Vinayak-Mete

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुपर मुख्यमंत्री शरद पवार असे महाविकास आघाडी सरकारचे तीन मुख्यमंत्री आहेत; पण त्यांच्यात ताळमेळ नाही. सरकारचे स्टेअरिंग ठाकरे यांच्या नाही, तर  आपल्याच हाती आहे, हे अजित पवारांनी दाखवून दिले आहे,’’ असा टोला शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी सोमवारी लगावला.

राज्याला तीन मुख्यमंत्री; पण स्टेअरिंग अजित पवारांकडे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुपर मुख्यमंत्री शरद पवार असे महाविकास आघाडी सरकारचे तीन मुख्यमंत्री आहेत; पण त्यांच्यात ताळमेळ नाही. सरकारचे स्टेअरिंग ठाकरे यांच्या नाही, तर आपल्याच हाती आहे, हे अजित पवारांनी दाखवून दिले आहे,’’ असा टोला शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी सोमवारी लगावला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नुकत्याच एका मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारचे स्टेअरिंग आपल्या हाती असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दोघांचे इलेक्‍ट्रिक कारमधील छायाचित्र शेअर केले आहे. या छायाचित्रात कारचे स्टेअरिंग अजित पवारांच्या हाती आहे. त्यावरून मेटे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सरकारवर निशाणा साधला.

उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा - उद्धव ठाकरे

मराठा आरक्षणाची सुनावणी घटनात्मक विषय असल्याने ती घटनापीठाकडे द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली आहे. त्यावर २५ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil