Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांना मानवाधिकार आयोगाची नोटीस, काय आहे प्रकरण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra State Human Rights Commission issued show cause notice to NCP Jitendra Awhad

जितेंद्र आव्हाडांना मानवाधिकार आयोगाची नोटीस, काय आहे प्रकरण?

मुंबई : महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने सिव्हिल इंजिनीअरचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड आणि तीन पोलिस अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

प्रकरण काय आहे?

व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असलेल्या अनंत करमुसे यांनी सन २०२० मध्ये सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्ते करमुसेंना आव्हाडांच्या घरी घेऊन गेले होते. यावेळी आव्हाडांनी कुरमुसेंना मारहाण केली होती. यानंतर वर्षभरानंतर १४ ऑक्टोबर २०२१ रोजी जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. पुढे ठाणे कोर्टानं आव्हाड यांची जामिनावर सुटका केली होती.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत व्हावा अशी मागणी याचिकाकर्ते कुरमुसे यांनी मुंबई हायकोर्टात केली होती. पण कोर्टानं त्यांची मागणी फेटाळून लावली.

हेही वाचा: मंत्रिपद पुन्हा डावलल्याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, कदाचित...

Web Title: Maharashtra State Human Rights Commission Issued Show Cause Notice To Ncp Jitendra Awhad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NCPDr.Jitendra Awhad