esakal | Maharashtra: राज्यात पुढचा आठवडाही पावसाचा
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात पावसाचा जोर वाढणार
राज्यात पुढचा आठवडाही पावसाचा

राज्यात पुढचा आठवडाही पावसाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यभरात पुढील आठवडाभर तरी आकाश ढगाळ आणि काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने राज्यभर हजेरी लावली होती. तसेच, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे पिकांची मोठी हानी झाल्याचे पाहायला मिळाले. आता आठवडाभर तरी राज्यात ही स्थिती कायम राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा परतीचा प्रवास आणि बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांसह राज्यातील विविध भागात दुपारनंतर अचानक ढगांची गर्दी होत. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचे चित्र आठवडाभर पाहायला मिळाले.

हेही वाचा: मुंबई : लवकरच एसटीच्या पती-पत्नी एकत्रिकरणाच्या बदल्या होणार

पुढील आठवड्यात मात्र सोमवार (ता.११) नंतर पावसाने काहीशी विश्रांती घेण्याची शक्यता असून, गुरुवारी (ता.१४) बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा एकदा पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी, तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

उत्तर भारतातून मॉन्सून परतला

शनिवार पर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर भारतातील बहुतेक भागातून माघार घेतली आहे. संपूर्ण राजस्थान, तसेच गुजरात, बिहार आणि झारखंडच्या उत्तर भागातूनही मॉन्सून परतला आहे. पुढील काही दिवस तरी मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पूरक वातावरण असल्याचे हवामान खात्याने कळविले आहे.

loading image
go to top