एसटीत आता स्वेच्छा निवृत्ती... 28 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्‍यता 

अशोक मुरुमकर 
Saturday, 25 July 2020

महामंडळाने तयार केलेला स्वेच्छा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 28 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्‍यता आहे.

अहमदनगर : बीएसएनलनंतर आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव आणला आहे. याला संचालक मंडळानी मान्यता दिली आहे. मात्र, याला कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. 

महामंडळाने तयार केलेला स्वेच्छा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 28 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्‍यता आहे. स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना महामंडळ केवळ तीन महिन्यांचा पगार देणार आहे. याला कर्मचारी संघटनाचा विरोध असून तीन महिन्यांच्या पगाराचा निर्णय मान्य नसून एसटी कामगारांना सहा महिन्यांचा पगार किंवा वारसाला नोकरी, अशी मागणी केली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्‍लिक करा 

कोरोना व्हायरसच्या संकटात एसटीचे मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एसटीचा पूर्वीचा तोटा पाच हजार कोटी आहे. त्यात लॉकडाऊनमुळे दोन हजार दोनशे कोटींची भर पडली आहे. महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडे 480 कोटी मागितले आहेत. त्यात महामंडळात क्षमतेपेक्षा अधिक कर्मचारी झाल्यानं स्वेच्छा निवृत्ती योजना एसटी महामंडळानं आणली आहे. गेल्या महिन्यात कर्मचाऱ्यांचे निम्मे पगार झाले होते. एसटीच्या एकूण क्षमतेपेक्षा फक्त सद्या 10 टक्के गाड्या सुरू आहेत. 

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra State Transport Corporation proposes voluntary retirement, many employees may lose their jobs