महाराष्ट्राने केली कोरोनावर यशस्वी मात

Corona
Corona

पुणे - देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना संसर्ग वाढीचा वेग आणि मृत्यूदर महाराष्ट्रात कमी आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही सातत्याने कमी होत असल्याचे निरीक्षण खात्याने नोंदविले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सप्टेंबरमध्ये देशात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात होती. त्यातही राज्यातील ७० टक्के रुग्ण पुण्या-मुंबईमध्ये होते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वी मात करत महाराष्ट्राने कोरोना यशस्वी नियंत्रित केल्याचे चित्र सध्या आहे.  

'भारतीय वैद्यक संशोधन परिषद’ (आयसीएमआर) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी कोरोनाचे उपचार आणि प्रतिबंधासाठी वारंवार दिलेल्या मार्गदर्शन सूचनांची महाराष्ट्राने काटेकोर अंमलबजावणी केली. त्यासाठी सातत्याने कोरोनाच्या प्रयोगशाळा चाचण्या वाढविल्या. त्यातून सुरुवातीला कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली. परंतु, त्यामुळे रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना संसर्गापासून दूर ठेवता आले तसेच संसर्ग झालेल्यांवर तातडीने उपचार सुरू झाले. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत असले तरीही त्यातून होणारे मृत्यू रोखता आले, असा विश्वास खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.  महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, पुणे या शहरांत परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. शिवाय लोकसंख्येची घनता आणि शहरीकरण अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. असे असूनही दर दशलक्ष लोकसंख्येत दररोज आढळणारे कोविड रुग्ण, बरे होऊन जाणारे रुग्ण आणि त्या तुलनेत कमी होत असलेले मृत्यू याची सांगड घातली तर महाराष्ट्राने उचललेल्या पावलांमुळे कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण (आकडे टक्क्यांत)

  • महाराष्ट्र - २४.६
  • केरळ - ४६.३

मृतांची संख्या मोठी असली तरी... 
महाराष्ट्रात कोरोनाच्या एकूण मृत्यूंची संख्या जास्त असली तरी मृत्यू दर दशलक्ष लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत कमी आहे. २ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत ६४७, गोव्यामध्ये ५२७, पॉँडेचरीत ५२२, आणि महाराष्ट्रात ४०३ मृत्यू झाले. त्यामुळे महाराष्ट्र हे दर दश लक्ष लोकसंख्येचा विचार केला तर सर्वाधिक मृत्यू असलेले राज्य म्हणता येणार नाही. 

संसर्गाचा दर
कोरोनाच्या वाढत्या दराचा विचार केला तर ३ फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दररोजचा कोविड वाढीचा दर ०.१० टक्के होता. केरळमध्ये तो महाराष्ट्रापेक्षा सहा पट जास्त म्हणजे ०.६१ टक्के असल्याचे दिसते. गोव्यात ०.२, पंजाब ०.१२, गुजरात आणि छत्तीसगड ०.११ टक्के असा दर होता.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com