

Maharashtra Ration Card
esakal
मुंबई: सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या 'राईटफुल टार्गेटिंग' आणि 'मिशन सुधार' मोहिमेत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. रेशन कार्ड व्यवस्थापन प्रणालीचा डेटा इतर केंद्रीय यंत्रणांच्या डेटाबेसशी जुळवला असता, महाराष्ट्रात तब्बल ४३ लाख ३३ हजारांपेक्षा अधिक संशयित व अपात्र रेशन कार्ड आढळली.