
TET Exam 2025
Sakal
Summary
उमेदवार आता अर्ज ४ ते ९ ऑक्टोबर २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरू शकतात.
परीक्षा शुल्क ९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने भरता येईल.
अतिरिक्त मुदतवाढ मिळणार नाही, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे होणारी शिक्षक पात्रता परीक्षा ( टीईटी -२०२५) रविवारी (दि.२३) नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान राज्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक कारणामुळे ज्यांना परीक्षा शुल्क भरता आले नाही त्यांनाही याबाबत दिलासा मिळाला आहे.