Tribal Area
Tribal Area esakal

इथे ना लाईट, ना रस्ते; महाराष्ट्रपेक्षा गुजरात सोईस्कर! आदिवासींची सार्वत्रिक भावना

रस्त्याचा प्रश्न जटिल, विजेचा त्याहून गंभीर


विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : कर्नाटक सीमेवरील गावांची सर्वत्र चर्चा होत असताना महाराष्ट्राच्या दुसऱ्या राज्यांना जोडलेल्या सीमेलगतच्या गावातही असंतोष उफाळून आला आहे. सुरगाणा तालुक्यातील ५५ हून अधिक आदिवासी गावे, वाडे, वस्त्या गुजरात सीमेनजीक आहेत. राज्य सरकार असेल किंवा जिल्हा परिषद आपल्या समस्यांकडे ढुंकून पाहायलाही तयार नाही, अशी भावना इथल्या आदिवासी बांधवांची आहे. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, मोबाईल कनेक्टिविटी या सगळ्याच बाबी दुर्लक्षित आहेत. या मूलभूत सुविधांसाठी या गावांचा संघर्ष आहे. या गावांमधील नेमकी स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा 'सकाळ’ ने प्रयत्न केला. यात दळवणवळणाच्यादृष्टीने आवश्यक रस्त्यांचा प्रश्न जटिल असल्याचे तर, विजेचा प्रश्न गंभीर असल्याचे समोर आले...

Tribal Area
Tution Fee : शिक्षण हा धंदा नाही, ट्युशन फी परवडणारीच हवी; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

गुजरातला जोडण्याची मागणी करणारे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील सर्वात शेवटचे अन् अगदी गुजरात सीमेवर असलेल्या १२०० लोकसंख्या असलेले खुंटविहिर गाव. या गावाला जाण्यासाठी असलेला आंबाठा-डोलारे -रानविहिर मार्ग. मात्र, हा रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय. खड्यात रस्ते की रस्त्यावर खड्डे हेच कळत नाही. तब्बल १० ते १२ वर्षापूर्वी हा रस्ता तयार झाला आहे. त्यानंतर डागडुजी झाली नसल्याने पार उखडून गेला आहे. येथूनच नजीक असलेला खुंटविहिर-मोहपाडा रस्त्याची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.

गतवर्षीच हा रस्ता दुरूस्त झाला. मात्र, यंदा हा रस्ता उखडलेला दिसत आहे. हीच परिस्थिती सीमलगत असलेल्या ५० गावातील रस्त्यांची आहे. रस्ता बिकट असल्याने या भागात एसटी महामंडळाची बस देखील गावात वेळात येत नाही. रस्ता योग्य नसल्याकारणाने गावात १०८ रुग्णवाहिका येत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे गावातील रुग्णांना गुजरातमधीरल डांग, येथील शासकीय रुग्णालयात नेण्याची नामुष्की येते.

Tribal Area
Jalgaon Milk Union Election : सासू-सासऱ्याच्या पॅनलविरुद्ध सुनेचा प्रचार

रस्त्यांची अवस्था अशी असताना गावात विजेचा प्रश्नही मोठा. गावातील प्रत्येक घरात अद्यापही वीज कनेक्शन पोहचलेले नाही. ज्या घरात वीज आहे ती देखील वेळेवर उपलब्ध नसते. २४ तासातील १२ ते १३ तास लाईट नसते. पावसाळ्यात तर, चार-चार-पाच दिवस लाईट गायब असते. वीज कनेक्शन तुटले अथवा बिघाड झाल्यास ४-४ दिवस दुरुस्ती होत नाही. वीज नसल्याने गावात पाणी पुरवठा असलेल्या नळाला पाणी येत नाही. पर्यायाने पाण्यासाठी वणवण करावी लागते.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

गुजरातमध्ये जाण्याची मागणी करणारी सीमावर्ती गावे

सुंकटविहिर, गोंददगड, उदालदरी, झारणीपाडा, रानविहिर, मोहपाडा, मालगोंदा, उंबरपाडा, पिंपळसोंड, ऊदमाळ, रानजुने, करवळपाडा, हाडकाईचोंड, गोंदुणे, केळीपाडा, चिंचलेख, बर्डीपाडा, वडपाडा, चंर्दपूर, कुकर्डेने, रगतपाडा, देशमुखनगर, चिंचपाडा, सोनगीर, सुंदुरबन, रगतविहिर, फणसपाडा, मांधा, जांबुळपाडा, बंगालपाडा, गुहीर, मालपाडा, टेंभळपाडा, करजू (का), बोरचोंड, वांगन, चिंचमाळ, बर्डा. खर्डी विभागातील खाणीचा पाडा, सांपाडा, भेंदचेख, वडपाडा खोप, खोबळा, मंजुरी, राक्षसभुवन, मांडवे, जगलपाडा, खोकलविहिर, खिर्डी, भारी आदी.



''प्रत्येक निवडणुकीत येणा-यांकडून गावाला रस्ता देण्याचे आश्वासन. मात्र, निवडणुका झाल्या की कोणीही फिरकत नाही. त्यामुळे गावाला जोडणारे रस्ते नाही. मात्र, येथूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील रस्ते चकाचक. आम्हाला सुरगाणा जाण्यापेक्षा साखळपातळ, बारस्ते (जि.डांग, गुजरात) येथे जाणे सोईस्कर वाटते. महाराष्ट्रपेक्षा गुजरात राज्याने तेथील गावांना मूलभूत सुविधा दिलेल्या आहेत.''
- रामा बापू गावित, ग्रामस्थ, खुंटविहिर, ता. सुरगाणा.

''गावात वीज आहे मात्र, लाईट नसते. दिवसातून १२ ते १४ तास वीज गायब असते. अनेकदा गाव अंधारात असते. गावात एकच पाणी पुरवठा योजना. त्यातही वीज नसल्याने त्यास पाणी येत नाही. डिजिटल इंडिया दाखविला जातो. गावात मोबाईलला नेटवर्क देखील नाही. आम्ही गुजरातचे सीमकार्ड व नेटवर्क वापरतो. सुविधा मिळत नसल्याने गुजरात राज्याला गाव जोडले गेले पाहिजे.'' - हिरामण वाघमारे, ग्रामस्थ, खुंटविहिर.

Tribal Area
कर्नाटकनंतर आता मध्यप्रदेश सीमावाद? बुलढाण्यातील ४ गावांचा राज्यसरकारला इशारा


''गावात दूधाचे उत्पादन चांगले. मात्र, दुध संकलन केंद्र नव्हते. गुजरात सरकारच्या मदतीने गावात दुध संकलन केंद्र सुरू करत, इमारत बांधून दिलेली आहे. गावातील महिला दूध या केंद्रावर संकलित करतात. दर महिन्याला ९ लाख रूपयांचा टर्नओव्हर आहे. आम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गावातील महिलांना प्रसुतिसाठी आरोग्य केंद्रावर सेवा मिळत नसल्याने आम्हाला गुजरातला जावे लागते.''
- सुनिता गवळी, ग्रामस्थ, उंबरपाडा सुरगाणा.

''गावाला आवश्यक असणारे रस्ते असो की वीज मिळत नाही. मात्र, अगदी एक ते दीड किलोमीटरवर असलेल्या गुजरातमधील गावांमध्ये रस्ते चकाचक दिसतात. येथील गावांना २४ तास वीजपुरवठा होतो. त्यामुळे या सुविधा आम्हाला मिळाव्यात यासाठी गुजरात राज्याला आमची गावे जोडण्यात यावी.''
- रामा चौधरी, ग्रामस्थ, उंबरपाडा सुरगाणा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com