

Unauthorized Schools in Maharashtra
esakal
नागपूर: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ करणाऱ्या अनधिकृत शाळांचा राज्यात सुळसुळाट झाल्याचे शिक्षण विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यात तब्बल ५२६ अनधिकृत शाळा आढळून आल्या. त्यापैकी केवळ ४३ शाळा बंद करण्यात आल्या असून, तब्बल ४८३ शाळा अजूनही सुरू आहे. यामुळे अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.