

Dark clouds and lightning over Maharashtra signal incoming unseasonal rain, thunderstorms, strong winds, and possible hailstorm affecting multiple regions.
esakal
राज्यातील पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 30 मार्चपासून महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. यामुळे खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, जोरदार वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.