धनगर आरक्षणावरुन सभागृह तहकूब

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जुलै 2018

नागपूर : धनगर समाजाला अनुसूचित जातीचं आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधान परिषदेचं कामकाज आज (बुधवार) दहा मिनिटे स्थगित करावे लागले. 

सरकार आश्वासन देऊनही धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत दिशाभूल करत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराव वडकुते यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. मात्र या चर्चेला आदिवासी विकास मंत्र्यांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावे, या मागणीवर विरोधक अडून राहिले आणि हौद्यात येऊन त्यांनी गदारोळ घातला. त्यामुळे सदनाचं कामकाज दहा मिनिटे तहकूब करावे लागले.

'सरकारने गेली चार वर्षे  धनगर समाजाची फसवणूक केली. त्यामुळे आता सरकारकडून आरक्षण देणार की नाही याबद्दल ठोस उत्तर द्यायला पाहिजे', अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी धनगर आरक्षणाला विरोध करत असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगर समाजाला आरक्षण कसे देणार आहेत, असा प्रश्नही मुंडे यांनी उपस्थित केला .

धनगर समाजाकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोन बदललेला नाही, अशी टीका करत काँग्रेसचे रामहरी रुपनवर यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची मागणी केली.

शिवसेनेचा धनगर आरक्षणाला पाठिंबा आहे सरकारने ते लवकरात लवकर द्यावे असे शिवसेनेच्या नीलम गोर्हे यांनी या चर्चेत सांगितले .गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर है आरक्षण कधीच मिळाले असतें असा टोलाही गोऱ्हे यांनी यावेळी लगावला.

Web Title: Maharashtra Vidhan Parishad adjourned over Dhangar Reservation demand