esakal | भाजपचे स्वबळाचे स्वप्न भंगले; राज्यात नवे समीकरण? | Election Results 2019
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपचे स्वबळाचे स्वप्न भंगले; राज्यात नवे समीकरण? | Election Results 2019

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षांतर करून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केल्याने यंदाची विधानसभा निवडणूक गाजली होती. काही अपवाद वगळता यापैकी सर्व 'आयारामां'ना सत्ताधारी पक्षांनी उमेदवारी दिली आहे, त्यामुळे या जागांच्या निकालाकडे लक्ष होते.

भाजपचे स्वबळाचे स्वप्न भंगले; राज्यात नवे समीकरण? | Election Results 2019

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजप-शिवसेना महायुतीत लढले असले तरी निकालापूर्वीच स्वबळावर सत्तेवर येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपचे स्वप्न सुरवातीच्या कलानुसार भंगल्याचे दिसत आहे. भाजपला सत्तेसाठी शिवसेनेची मदत घेण्याशिवाय पर्याय नाही हे सध्यातरी दिसत आहे. तसेच राज्यात नवे राजकीय समीकरण उदयास येण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षांतर करून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केल्याने यंदाची विधानसभा निवडणूक गाजली होती. काही अपवाद वगळता यापैकी सर्व 'आयारामां'ना सत्ताधारी पक्षांनी उमेदवारी दिली आहे, त्यामुळे या जागांच्या निकालाकडे लक्ष होते. धनंजय मुंडे, रोहित पवार, आदित्य ठाकरे, आदिती तटकरे असे प्रमुख उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील माजी मंत्री नशीब अजमावत आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात उतरविल्याने ही लढत महत्त्वपूर्ण ठरली होती.