Vidhan Sabha 2019 : शिवसेनेच्या यादीत आयारामांना पायघड्या

सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 68 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, यात नव्यानेच पक्षात प्रवेश केलेल्यांना तिकीट देण्यात आले आहे. शिवसेनेच्या या यादीत पाच महिला उमेदवारांचा समावेश आहे.

विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 68 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, यात नव्यानेच पक्षात प्रवेश केलेल्यांना तिकीट देण्यात आले आहे. शिवसेनेच्या या यादीत पाच महिला उमेदवारांचा समावेश आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप व मित्रपक्षांची युती झाली असून, जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर केला नाही. मात्र, शिवसेनेला 288 पैकी 124 जागा सोडण्यात आल्याचे समजते. यापैकी शिवसेनेने 68 उमेदवार आज घोषित केले. यात अन्य पक्षांतून आलेल्या 9 जणांचा समावेश आहे. कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या विठल लोकरे, अब्दुल सत्तार, निर्मला गावित तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेले भास्कर जाधव, जयदत्त क्षीरसागर, पांडुरंग बरोरा, संग्राम कुपेकर आणि सुहास कांदे यांना तिकीट देण्यात आले आहे. माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. राजश्री पाटील, यामिनी जाधव, प्रीती संजय, आमशा पाडवी, निर्मला गावित या पाच महिलांचा यादीत समावेश आहे. 

शिवसेना यादी 
नांदेड दक्षिण - राजश्री पाटील, मुरूड - महेंद्र सेठ दळवी, हदगाव - नागेश पाटील आष्टीकर, मुंबादेवी - पांडुरंग सकपाळ, भायखळा - यामिनी जाधव, गोवंडी - विठ्ठल लोकरे, एरंडोल पारोळा - चिमणराव पाटील, वडनेरा - प्रीती संजय, श्रीवर्धन - विनोद घोसाळकर, कोपर पाचपाखाडी - एकनाथ शिंदे, वैजापूर - रमेश बोरनावे, शिरोळ - उल्हास पाटील, गंगाखेड - विशाल कदम, दापोली - योगेश कदम, गुहागर - भास्कर जाधव, अंधेरी पूर्व - रमेश लटके, कुडाळ - वैभव नाईक, ओहोळा माजिवडा - प्रताप सरनाईक, बीड - जयदत्त क्षीरसागर, पैठण - संदीपान भुमरे , शहापूर - पांडुरंग बरोरा, नगर शहर - अनिल राठोड, सिल्लोड - अब्दुल सत्तार, औरंगाबाद पश्‍चिम - संजय शिरसाट, अक्‍कलकुवा - आमशा पाडवी, इगतपुरी - निर्मला गावित, वसई - विजय पाटील, नालासोपारा - प्रदीप शर्मा, सांगोला - शहाजी बापू पाटील, कर्जत - महेंद्र थोरवे, घनसांगवी - डॉ. हिकमत दादा उडाण, खानापूर - अनिल बाबर, राजापूर - राजन साळवी, करवीर - चंद्रदीप नरके, बाळापूर - नितीन देशमुख , देगलूर - सुभाष साबणे, उमरगा - ज्ञानराज चौगुले, दिग्रज - संजय राठोड, परभणी - डॉ. राहुल पाटील, मेहकर - डॉ. संजय रायमुलकर, जालना - अर्जुन खोतकर, कळमन्नुरी - संतोष बांगर, कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर, चंदगड - संग्राम कुपेकर, वरळी - आदित्य ठाकरे, शिवडी - अजय चौधरी, हातकणंगले - सुजित मिणचेकर, राधानगरी - प्रकाश आबिटकर, पुरंदर - विजय शिवतारे, दिंडोशी - सुनील प्रभू, जोगेश्‍वरी पूर्व - रवींद्र वायकर, नागाठाणे - प्रकाश सुर्वे, विक्रोळी - सुनील राऊत, अणुशक्‍ती नगर - तुकाराम काते, चेंबूर - प्रकाश फातर्फेकर, कुर्ला - मंगेश कुडाळकर, कालिना - संजय पोतनीस, माहिम - सदा सरवणकर, जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील, पाचोरा - किशोर पाटील, मालेगाव - दादाजी भुसे, सिन्नर - राजाभाऊ वाजे, निफाड - अनिल कदम, देवळाली - योगेश घोलप, खेड आळंदी - सुरेश गोरे, पिंपरी - गौतम चाबुकस्वार, येवला - संभाजी पवार, नांदगाव - सुहास कांदे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra vidhansabha 2019 Shivsena List Politics