

maharashtra weather update
ESakal
मान्सून देशातून परतला असला तरीही अद्याप अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रात येत्या चार ते पाच दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे बुधवार २९ ऑक्टोबरपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर होणार असल्याचंही हवामान विभागानं म्हटलंय.