esakal | महाराष्ट्रावर ‘जवाद’चे संकट; मराठवाड्याला बसणार जोरदार फटका | Weather Alert
sakal

बोलून बातमी शोधा

cyclone

महाराष्ट्रावर ‘जवाद’चे संकट; मराठवाड्याला बसणार जोरदार फटका!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : मागील दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत मॉन्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाने मध्य महाराष्ट्रासह विदर्भ व महाराष्ट्राला झोडपून काढले. आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. जवाद असे या चक्रीवादळाचे नाव आहे. याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये गुलाब चक्रीवादळ तयार झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. यानंतर अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले होते. शाहीन चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून दूर जाऊन पाकिस्तान-मकरान किनारपट्टीच्या दिशेने गेल्याने भारताला धोका झाला नाही. मात्र, आता जवाद चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले आहे.

हेही वाचा: चंद्रपूरनंतर नागपुरात सिलिंडरचा स्फोट; तिघे गंभीर जखमी

सध्या केरळ किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवसांत या हवेच्या कमी दाब्याच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चक्रीवादळाची दिशा पूर्वेकडे असून हे बंगालच्या उपसागराकडे सरकणार असल्याचे हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झाले की याचे जवाद असे नामकरण होईल. साधारण चौदा ते पंधरा तारखेला जवाद चक्रीवादळ निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१६ ऑक्टोबरला वाढणार तीव्रता

चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पुढील आठवड्यात १६ ते १७ ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना जोरदार फटका बसणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १६ ऑक्टोबरला हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार आहे. यावेळी चक्रीवादळाची तीव्रता वाढलेली असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ख्रिस्तियानो रोनाल्डोविरुद्ध बलात्काराचा आरोप; ही आहे अपडेट

मराठवाड्याला पुन्हा फटका बसण्याची शक्यता

आंध्र प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड, महाराष्ट्रातील विदर्भ, पूर्व मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे. पुढील आठवड्यात १६ आणि १७ ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

loading image
go to top