गेल्या आठवड्याभरापासून राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसानं हाहाकार उडाला आहे. जिथं दुष्काळ असतो त्या जिल्ह्यांमध्ये महापूर आल्यानं गंभीर स्थिती निर्माण झालीय. यातच आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल तर मराठवाडा विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.