Maharashtra Weather Update
esakal
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उत्तर आणि दक्षिणेकडील काही राज्यातही मुसळधार पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. दक्षिण -पूर्व अरबी समुद्र आणि केरळ- कर्नाटकाच्या किनारपट्टीपासून ते लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा पश्चिम-उत्तर पश्चिमकडे सरकत आहे. त्यामुळे पुढचे सात दिवस पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.