

Maharashtra weather
esakal
Cold Wave Imd Forecast : डिटवाह चक्रिवादळामुळे अचानक वातावरणात बदल झाल्याने थंडी गायब झाली होती. दरम्यान, राज्यात पुन्हा पुढच्या ४ दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पहाटे गारठा कायम असला तरी, आकाश निरभ्र होऊन कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. पुढील दोन दिवसांत राज्याच्या किमान तापमानात हळूहळू घट होत पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.