

Maharashtra Rain Update
esakal
Maharashtra Rain Update : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत असल्या, तरी बहुतांश भागांत अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, वातावरणात दमटपणा जाणवत आहे. पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असले तरी सर्वदूर जोरदार पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता चांगल्या पावसाकडे लागले आहे.