Maharashtra Weather: महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलीय. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसानं झोडपलं असून मोठ्या प्रमाणावर पीकांचे नुकसान झालंय. मे महिन्याच्या सुरुवातीला उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्यानं दिलासा मिळालाय. तर हवामानात मोठा बदल झाला आहे. दरम्यान, पुणे, मुंबई, नाशिक आणि सातारा या जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. दुसरीकडे नाशिक आणि सातारा जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर अहिल्यानगर आणि पुण्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.