Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Maharashtra Weather Forecast : राज्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोणत्या भागात पावसाचा जोर राहणार? जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज.
Maharashtra Weather Forecast next 5 days rain alert

Maharashtra Weather Forecast next 5 days rain alert

esakal

Updated on

Maharashtra Rain Forecast : राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून, आज (ता. १४) कोकण आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, नंदुरबार आणि नाशिक घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित भागांत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com