

Cold wave conditions grip Maharashtra as winter temperatures drop across Pune, Nashik, Mumbai, and North Maharashtra districts.
esakal
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांतही थंडी कायम राहणार आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर , पुणे आणि सोलापूर या सात जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. आज तुमच्या भागात कसे हवामान असेल हे जाणून घेऊया.