Weather department predicts rain In Maharashtra : उत्तर भारतातून दक्षिणकडे वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. सोमवारी मुंबईत १३ अंश किमान तापमानाची नोंद झाली. तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पारा १२ अंशाच्याही खाली आहे. पुढचे दोन तीन दिवस आणखी थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.