
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. कोकण, घाटमाथ्यासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उर्वरित कोकण, नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. नाशिक घाटमाथ्यावर येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.