राज्यात पुढील ४-५ दिवसात तुरळक आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस; २१ जुलैनंतर तीव्रता वाढणार

Maharashtra Weather Updates राज्यात पुढील चार ते पाच दिवसात तुरळक आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मात्र सध्या तरी मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचंही हवामान विभागानं स्पष्ट केलंय.
Monsoon

Monsoon

sakal

Updated on

आठवड्याभरापासून पावसाने विश्रांती घेतली होती. आज सकाळी काही ठिकाणी पावसाची रिपरिप झाली. मात्र येत्या चार ते पाच दिवसात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. राज्यात तुरळक आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मात्र सध्या तरी मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचंही हवामान विभागानं स्पष्ट केलंय. अजूनही मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात पावसाची प्रतीक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com