

Rain forecast in four districts of Maharashtra
esakal
weather news and rain prediction : ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला असला तरी परतीचा पाऊस होत नसल्याचे चित्र राज्यात आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. आज (ता. २४) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या चार जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.