
राज्यात गेल्या चार दिवसांपासून वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय, तर कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.