Maharashtra Weather Update: चक्रीवादळाचं संकट! 13 राज्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार?

Maharashtra Weather Today: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण भारतातील 13 राज्यांमध्ये जोरदार वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढू लागला असून निफाडमध्ये तापमानाचा पारा 11.1 अंशांपर्यंत खाली आला आहे.
Maharashtra Weather Update: Cyclone Alert in Bay of Bengal! Rain Warning for 13 States, Will Cold Increase in Maharashtra?

Maharashtra Weather Update: Cyclone Alert in Bay of Bengal! Rain Warning for 13 States, Will Cold Increase in Maharashtra?

eSakal

Updated on: 

सध्या बंगालच्या उपसागरात हवामानात मोठे बदल होत असून, तेथे तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामान बिघडू शकते. भारतीय हवामान विभागाने देशातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही भागांत मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून, वाऱ्यांचा वेग ताशी 100 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.

Loading content, please wait...