

Scorching heatwave conditions in Vidarbha alongside cloudy skies and rainfall activity in parts of Central Maharashtra.
esakal
राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत पुढील तीन दिवस अतितीव्र उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात मात्र पावसासाठी अनुकूल हवामान तयार झाले असून काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता आहे.