Maharashtra Weather : राज्यात ऐन हिवाळ्यात थंडी गायब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता; जाणून घ्या तुमच्या भागात आज कसे असेल हवामान?

Winter Temperature Rise : पुण्यात आज ढगाळ वातावरण राहणार असून किमान तापमान सुमारे १८°C राहू शकते. ढगाळ हवामानामुळे उत्तर महाराष्ट्रातील कमाल व किमान तापमानात वाढ झाली असून थंडी कमी झाली आहे. विदर्भातही तापमान वाढणार आहे.
Cloudy weather over Maharashtra as winter temperatures rise unusually, raising chances of light rain across coastal and central regions.

Cloudy weather over Maharashtra as winter temperatures rise unusually, raising chances of light rain across coastal and central regions.

esakal

Updated on

Summary

  1. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी झाल्याने राज्यातील हिवाळी थंडी कमी होऊन तापमानात वाढ झाली आहे.

  2. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची आज शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

  3. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूरमध्ये ढगाळ आकाश व हलका पाऊस संभवतो.

Maharashtra Rain Forecast : उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह कमी झाल्याने राज्यात ऐन हिवाळ्यात थंडी गायब झाली असून तापमानात वाढ झाली आहे. यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. आज (ता. २५) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच राज्यातील किमान तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com