Monsoon Update: मान्सूनचा वेग थांबला, राज्यात पावसाची उसंत, पण 'या' तारखेनंतर मुसळधार कोसळणार
Maharashtra weather : मान्सूनने यंदा विक्रमी वेगाने वाटचाल करत केरळसह, महाराष्ट्रात सर्वसाधारण वेळेआधी धडक दिली. मात्र अरबी समुद्रातून प्रवाह कमी झाल्याने जवळपास आठवडाभरापासून मन्सूनची चाल थांबली आहे.
राज्यात मागील काही दिवस मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता उसंत घेतली आहे. पुढील तीन दिवस राज्यात कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही असाअंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र विदर्भातील काही भागांत आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.