महाराष्ट्रात सोमवारपासून मॉन्सून बरसणार (व्हिडिओ)

monsoon.jpg
monsoon.jpg

पुणे : देशात उशिरा दाखल झालेला मॉन्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात येत्या सोमवारपासून (ता. 1) मुसळधार पाऊस पडेल, असा दिलासा पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी बुधवारी ट्विट करून दिला

सर्वसाधारणतः 1 जूनला मॉन्सून केरळमध्ये पोचतो. यंदा तो 8 जूनला केरळच्या समुद्राकिनाऱ्यावर बरसला. केरळमध्ये आठ दिवस उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनचा पुढील प्रवासही अडखळत झाला. या पार्श्‍वभूमिवर मॉन्सून सक्रिय होण्याचा अंदाज राजीवन यांनी वर्तविला आहे. भारतीय हवामान खाते केंद्रातील पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. त्याचे मंत्रालयाचे सचिव असलेल्या राजीवन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, यंदा देशात मॉन्सून उशिरा दाखल झाला. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून मॉन्सूनची सातत्याने प्रगती होत आहे.

मॉन्सूनची पुढील प्रगतीसाठीही पोषक हवामान तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या पोषक वातारणामुळे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मॉन्सून सक्रिय होईल. त्यामुळे ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या भागात 1 ते 6 जुलै दरम्यान जोरदार पाऊस पडेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com