
चुकीच्या इतिहासातून महाराष्ट्र पेटू देणार नाही; जितेंद्र आव्हाड
मुंबई : राजकीय पुढाऱ्यांनी समाजातील महागाई, गरिबी, रोजगार, शेतकऱ्यांबद्दल बोलले पाहिजे. पण काही नेते हे विषय सोडून विनाकारण चुकीचा इतिहास सांगून तरुणांच्या माथी मारून महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न आम्ही कधी यशस्वी होऊ देणार असा स्पष्ट इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाला जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले आणि अभ्यासपूर्ण संदर्भ देऊन प्रतिवाद केला. तुम्हाला भोंग्यावर बोलायचं असेल तर बोला, पण इतिहासाला हात घालू नका, असे थेट आव्हानही त्यांनी दिले.
ऐतिहासिक दाखले
शिवाजी महाराजांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली
महात्मा जोतिराव फुले यांनी १८६९ मध्ये रायगडावर जाऊन समाधीस्थळी स्वच्छता केली. त्याची बातमी नारायण मेघाजी लोखंडे यांनी दीनबंधू वर्तमानपत्रात छापून आणली होती
महात्मा फुले आणि करवीर संस्थानचे प्रमुख आबासाहेब घाटगे यांच्या निधनानंतर ही मोहीम थांबली. त्यानंतर टिळकांनी हे काम हाती घेतले. १९२० मध्ये टिळकांचे निधन झाले, तोपर्यंत समाधीसाठी काम झाले नव्हते. त्यांनी समाधी जीर्णोद्धार समिती स्थापन केली होती. समिती काम करत नसल्यामुळे १९३६ मध्ये ब्रिटिशांनी समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले.
Web Title: Maharashtra Will Not Let Greed From Wrong History Raj Thackeray Jitendra Awhad Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..