AJit Pawar and Sharad Pawar
AJit Pawar and Sharad Pawar

Sharad Pawar : महाराष्ट्राला लवकरच अजित पवार रिटर्न्स भाग-२ बघायला मिळणार; काँग्रेस नेत्याचं सूचक विधान

Published on

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळावर दररोज नवनवीन घडामोडी समोर येत आहे. सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी अजित पवार आमच्या परक्षातील ज्येष्ठ नेते असल्याचं म्हटलं होतं. त्यातच आता शरद पवार यांनी देखील अजित पवार आमचेच नेते असल्याचं म्हटलं. यावर आता अजित पवार रिटर्न्स भाग २ लवकरच महाराष्ट्राला पाहायला मिळेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

AJit Pawar and Sharad Pawar
Chandrashekhar Bawankule : उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल, ठाकरेंवर बोचरी टिका

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, शरद पवार यांच्या वक्तव्यावरुन असं लक्षात येत किंवा असा अंदाज लावू शकतो की, महाराष्ट्राला आणि देशाला अजित पवार रिटर्न्स भाग- २ लवकरच बघायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, काहीही झालं तरी मी भाजपसोबत जाणार नाही. मी इंडिया सोबत राहणार आहे.

AJit Pawar and Sharad Pawar
Maharashtra Rain Crisis : राज्यातील 216 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाची हुलकावणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले मंत्री पुन्हा पुन्हा येतात आणि शरद पवार यांच्या पाया पडतात. याचा अर्थ जी घाण राजकीय क्षेत्रात भाजपने महाराष्ट्रासह देशात केलेली आहे, त्याचं उत्तर अजित पवार रिटर्न्स भाग-२ मधून मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांनी असं वक्तव्य केलेलं असाव, असंही अतुल लोंढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com