

Maharashtra Winter Update
esakal
Maharashtra Cold Wave Prediction IMD : मागच्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरात थंडीची लाट आल्याने गारवा वाढला होता. दरम्यान उत्तरेतील शित लहरीत कमी आल्याने राज्यातील थंडीची लाट ओसरली आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण झाले आहे. महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे या भागात अद्यापही १० अंशाच्या खाली तापमानाची नोंद झाली आहे. तर काही ठिकाणी अद्याप धुके पाहायला मिळत आहे. आज (ता. १७) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू राहून, गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.