

Zilla Parishad Elections Result
Esakal
Maharashtra Zilla Parishad election 2026 Result : महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणातील महत्त्वाच्या लढतीचा आज (९ फेब्रुवारी २०२६) निर्णायक दिवस आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी शनिवारी (७ फेब्रुवारी) झालेल्या मतदानाची मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होत आहे. यामुळे महायुती (भाजप-शिंदे शिवसेना-एकनाथ शिंदे गट) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस-शरद पवार एनसीपी-उद्धव ठाकरे शिवसेना) यांच्यातील ग्रामीण भागातील वर्चस्वाचा फैसला आज होणार आहे.