दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान हुतात्मा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

पुणे: जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील नांदेड येथील जवान संभाजी यशवंत कदम (वय 35) व पंढरपूर येथील कुणाल मुन्ना गोसावी हे आज (मंगळवार) हुतात्मा झाले आहेत.

कदम त्यांच्या मागे आई, वडील, दोन विवाहीत बहिणी, पत्नी व तीन वर्षांची मुलगी आहे. त्यांचा 2006 मध्ये विवाह झाला होता. कदम यांचे लोहा तालुक्यातील जानापुरी हे गाव. पंढरपूर अर्बन बॅंकेचे संचालक मुन्ना गोसावी यांचे कुणाल हे वीरसुपुत्र होत. दोन जवान हुतात्मा झाल्याची माहिती कळताच नांदेड व पंढरपूरसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यावेळी सेवा बजावत असलेले कदम व गोसावी यांच्यासह अन्य जवानांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारादरम्यान कदम व गोसावी धारातीर्थी पडले.

दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी वाढली आहे. दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना जवान हुतात्मा होत आहेत.

Web Title: Maharashtra's Two Soldier martyr terrorist attack in kashmir