अखेर आशा वर्कर्सच्या मानधनात सरकारने केली वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

आशा सेविकांच्या मानधनात दरमहा २०००, तर आशा गटप्रर्तकांना मानधनात दरमहा ३००० अशी वाढ करण्यात आली आहे.

मुंबई - करोनाविरूद्धच्या लढ्यातील वॉरियर असलेल्या आशा सेविकांना ठाकरे सरकारने मानधन वाढ देत दिलासा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा सेविकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

करोनामुळे उद्भवलेल्या संकटकाळात राज्य सरकारकडून आशा सेविकांनाही मदतीला घेण्यात आलं आहे. त्यामुळे आशा सेविकांना देण्यात येणारा मोबदला वाढवण्यात यावा, अशी मागणी काही दिवसांपासून केली जात होती. या मागणीवर अखेर निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. त्याचबरोबर अनेक विषयांना मंजुरीही देण्यात आली. यात आशा सेविका व आशा गटप्रर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय घेत सरकारनं त्यांना दिलासा दिला आहे.

BIG NEWS वृत्तपत्र वितरणास मज्जाव केल्यास कारवाई; जिल्हा उपनिबंधकांचा सोसायट्यांना इशारा

आशा सेविकांच्या मानधनात दरमहा २०००, तर आशा गटप्रर्तकांना मानधनात दरमहा ३००० अशी वाढ करण्यात आली आहे. आशा सेविकांच्या मानधनवाढीसाठी १५७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तशी तरतूदही करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या ७१ हजार आशा सेविका कार्यरत आहेत.

आशा कर्मचारी, गटप्रवर्तक व महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन

महा विकास आघाडी सरकारने प्रचंड पाठपुराव्यानंतर व बेमुदत संपाचा इशारा नंतर हा निर्णय घेऊन अशा कर्मचारी व गटप्रवर्तक आना न्याय दिला त्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन. मानधनवाढ आमच्या हक्काची ही घोषणा घेऊन संघर्षाच्या मार्गावर वाटचाल केल्यामुळे राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. अशीच एकजूट पुढे ठेवा, अजून पूर्ण न्याय झालेला नाही संघर्ष चालू ठेवावा लागेल. योजना कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा व वेतन श्रेणी ह्या आपल्या मुख्य मागण्या असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे असं सीटू डॉ डी एल कराड चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष यांनी म्हटलंय.  

maharastra state government increased honorarium given to asha workers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharastra state government increased honorarium given to asha workers