Maharera QR Code : घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; एका क्लिकवर मिळणार गृहप्रकल्पाची संपूर्ण माहिती

घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी माहिती मिळाली आहे.
Maharera QR Code
Maharera QR Code

घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी माहिती मिळाली आहे. अनेकज जाहिरातींद्वारे घर शोधत असतात. पण कधी कधी जाहीरातीवरुन किंवा फोनवरुन गृहप्रकल्पाची संपूर्ण माहिती मिळणे शक्य नसते. त्यांमुळे बऱ्याच गोष्टींचाच सामना करावा लागतो. अशातच आता एका क्लिकवर गृहप्रकल्पाची संपूर्ण माहिती मिळणार आहे. (Maharera QR Code Offer advertisements Housing Project Information In Maharashtra )

१ ऑगस्ट पासून गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्या बाजुला ठळकपणे क्यूआर कोड असणे अत्यावश्यक राहणार आहे. तसे परिपत्रक महारेराने नुकतेच जारी केले आहे.

Maharera QR Code
Maharashtra Politics: धनंजय मुंडेंकडे नाशिकची जबाबदारी ? डावलल्याच्या बातम्यांबद्दल भुजबळ स्पष्टच बोलले

विकसक आपल्या गृहनिर्माण प्रकल्पात जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, यासाठी वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे , इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप या समाजमाध्यमे आणि विविध माध्यमांच्या मार्फत आपल्या प्रकल्पाच्या गुणवैशिष्ट्यांची जाहिराती करीत असतात. (Latest Marathi News)

कुठलेही माध्यम वापरून केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये आता महारेरा क्रमांक आणि महारेरा संकेतस्थळासोबतच क्यूआर कोडही ठळकपणे दर्शवणे, छापणे बंधनकारक करण्यात आले आहे.

क्यूआर कोडद्वारे नेमकी माहित काय मिळणार?

या क्यूआर कोडमुळे घर खरेदीदारांना या प्रकल्पाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सर्व प्राथमिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. घर खरेदीदार किंवा स्थावर संपदा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कुणालाही संबंधित प्रकल्पाबाबत विविध प्रकारची माहिती हवी असते.(Latest Marathi News)

यात प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे, प्रकल्प कधी नोंदवल्या गेला, प्रकल्पाविरुद्ध काही तक्रारी आहेत का ? प्रकल्पाच्या विविध मंजुऱ्या, प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यात काही बदल केला का?, प्रकल्पाच्या नोंदणीचे नूतनीकरण केले का? , असा सर्व तपशील या क्यूआर कोडमुळे एका क्लिकवर सहजपणे उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहकाला निर्णय घ्यायला मदत होणार आहे.

Maharera QR Code
Maharashtra Politics: "ठाकरे गटाचे उमेदवार आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढतील?"

याशिवाय रेरा कायद्यातील तरतुदीनुसार विकासकांना दर ३ महिन्याला आणि ६ महिन्याला विविध प्रपत्रांमध्ये माहिती त्यांच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी लागते . यातील प्रपत्र ५ अत्यंत महत्त्वाचे प्रपत्र आहे. हे दरवर्षी प्रकल्पाच्या संकेतस्थळावर टाकणे बंधनकारक आहे. यात या प्रकल्पाची सद्यस्थिती आणि एकूण खर्च आणि बाकीचे तपशील उपलब्ध होतात . हे सर्व या क्यूआर कोड मुळे येथून पुढे घर बसल्या सहजपणे पाहता येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com