काचेच्या तावदानांवरील बंदीची अंमलबजावणी करा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - बंदी असूनही मुंबईत काचेची तावदाने असलेल्या इमारती उभारल्या जात आहेत. आग लागल्यास तेथील व्यक्तींना अशा इमारतींतून सुरक्षित बाहेर पडता येत नाही, असे वारंवार उघडकीस आले आहे. त्यामुळे या बंदीची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. 

इमारती आकर्षक दिसण्यासाठी काचेची तावदाने लावण्याचे प्रकार मुंबईत वाढत आहेत. विशेषत: सर्व्हिस सेक्‍टर व कॉर्पोरेट इमारतींमध्ये काचेची तावदाने लावण्यात येतात. 2014 मध्ये अंधेरीतील लोटस पार्क इमारतीला भीषण लागली होती. काचेमुळे धूर बाहेर पडू न शकल्याने त्यात अडकलेल्यांचा शोध घेणे, तसेच आगीच्या उष्णतेमुळे काचा फुटत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अग्निशामक दलाच्या जवानांना कठीण झाले होते. या आगीत अग्निशामक दलाच्या एका जवानाचाही मृत्यू झाला होता. या पार्श्‍वभूमीवर काचेची तावदाने असलेल्या इमारतींवर बंदी आणण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून, त्याबाबत कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे. 

या पार्श्‍वभूमीवर या बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाबाबत इमारतींसाठी धोरण तयार करून त्याचीही काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी केली आहे.

Web Title: maharshtra news glass buildings

टॅग्स