Mahavikas Aghadi: अशी असेल महाविकास आघाडीची भविष्यातील वाटचाल, आज बैठकीत ठरलं!

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi

Mahavikas Aghadi: आज चर्चगेट येथील एमसीए लाऊंज येथे महाविकास आघाडीच्या विधीमंडळ सदस्यांची संयुक्त बैठक पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही बैठक बोलावली होती. यावेळी महाविकास आघाडी एकत्र लढणार, पुन्हा वज्रमुठ सभा होणार, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

महाविकास आघाडी महत्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमधील नेते या बैठकीला उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचा निर्धार मविआ नेत्यांनी बैठकीत केला.

बाळासाहेब थोरात म्हणाले, आम्ही तिन्ही मित्र पक्ष एकत्र आहोत. एकत्र लढणार आहोत. लोक आमच्याबरोबर आहेत. आम्ही विभागवार बैठका घेणार आहोत. तसेल लवकरच वज्रमुठ सभा देखील सुरू होतील.  

Mahavikas Aghadi
Rahul Gandhi : भ्रष्टाचारावर तडजोड होणार नाही; कर्नाटकमधील मंत्र्यांसोबतच्या बैठकीत राहुल गांधींची भूमिका

सभा पाऊस थांबल्यानंतर सुरू होतील. विरोध पक्ष आम्ही समर्थपणे लढत आहोत. सरकारकडून आमच्या अपेक्षा आहेत. मात्र अभिप्रेत उत्तर सरकार टाळत आहे, असे थोरात म्हणाले. (latest marathi news)

संभाजी भिडेंवर आक्रमक -

बाळासाहेब थोरात म्हणाले, संभाजी भिडे यांच्या बाबातीत अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यांचे वक्तव्य सांगण्याची सुद्धा लाज वाटते. देशवासियांना सुद्धा लाज वाटते. मात्र सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. देवेंद्र फडणवीस त्यांना गुरूजी म्हणतात. हे गुरूजी कसे बोलतात बघा. फडणवीसांनी सुद्धा गुरूजी म्हणतांना विचार केला पाहीजे.

Mahavikas Aghadi
Kuno National Park: कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू , 4 महिन्यात 9वी घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com