निवडणुकीत 'यांना' पाडण्याचा 'मविआ'नं खूप प्रयत्न केला, पण..; असं कोणाबद्दल बोलले देसाई? Shambhuraj Desai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shambhuraj desai

बाळासाहेबांची शिवसेना व भाजपचे नेते एकत्र बसून पराभवाची कारणे शोधून काढू, असं देसाईंनी सांगितलं.

Shambhuraj Desai : निवडणुकीत 'यांना' पाडण्याचा 'मविआ'नं खूप प्रयत्न केला, पण..; असं कोणाबद्दल बोलले देसाई?

सातारा : जिल्ह्यात कुठेही अवैध दारू (Alcohol) व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही, असा असा इशारा उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.

गृह विभाग व उत्पादन शुल्क विभाग संयुक्त कारवाई मोठ्या प्रमाणात करतात; पण अधिकाऱ्यांची पाठ फिरली, की पुन्हा अवैध दारू व्यवसाय सुरू होतात. असे ज्या ठिकाणी होते तेथे अशा अवैध दारूविक्रेत्यांवर मोका लावता येईल का, याचा विचार केला जाईल, असंही देसाई म्हणाले.

जिल्हा परिषदेत आढावा बैठकीनंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, 'सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पाडण्याचा महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) खूप प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. अमरावतीत आम्हाला अपयश आले. त्याचे कारण शोधून काढण्यात येईल.'

तसेच नागपूरची जागा आम्ही शिक्षक संघटनांसाठी सोडली होती. तिथेही अपयश आले. याचा वरिष्ठ पातळीवर आम्ही विचार करून त्रुटी राहिल्या असतील, त्या आगामी काळात भरून काढू. बाळासाहेबांची शिवसेना व भाजपचे नेते एकत्र बसून पराभवाची कारणे शोधून काढू, असं देसाईंनी सांगितलं.

जिल्ह्यात अवैध दारू व्यवसाय वाढत असल्याबाबत विचारले असता देसाई म्हणाले, ‘‘जिल्ह्यात कुठेही अवैध दारू व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही. गृहविभाग व उत्पादन शुल्क विभाग संयुक्त कारवाई मोठ्या प्रमाणात करतात; पण अधिकाऱ्यांची पाठ फिरली, की पुन्हा अवैध दारू व्यवसाय सुरू होतात. असे ज्या ठिकाणी होत असेल तर अशा अवैध दारूविक्रेत्यांवर मोका लावता येईल का, याचा विचार केला जाईल.’’