'ठाकरे सरकार पाडण्यासाठी तारीख पे तारीख; आता भाजपकडून 2024 ची मुदत'

Balasaheb Patil vs BJP
Balasaheb Patil vs BJPesakal
Summary

विरोधी पक्षानं आत्तापर्यंत महाविकास आघाडीचं सरकार पडण्यासाठीच्या अनेकदा तारखा दिल्या; पण..

कऱ्हाड (सातारा) : विरोधी पक्षांकडून सरकार पाडण्यासाठीच्या सातत्यानं तारखा देण्यात येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना दिलेली 10 मार्च तारीख होवून नऊ दिवस झाले. मात्र, महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) भक्कम आहे, असं लक्षात आल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आम्ही २०२४ पर्यंत थांबतो आहोत, असं सांगितलंय. परंतु, आम्ही २०२४ च्या निवडणुकीलाही महाविकास आघाडी म्हणून दमदारपणे सामोरे जावू, असा विश्वास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी व्यक्त केलाय.

Balasaheb Patil vs BJP
'केजरीवालांनी अण्णा हजारेंशी गद्दारी केली म्हणून आपचा जन्म झाला'

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर विरोधी भाजपच्या (BJP) नेत्यांकडून सातत्यानं सरकार पडण्यासंदर्भात विधानं केली जात आहेत. त्यासंदर्भात विचारले असता सहकारमंत्री पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. मात्र, आम्हाला सत्ता मिळू शकली नाही, याचं शल्य असल्याचं विरोधकांच्या देहबोलीतून दिसून येतंय. निव्वळ सत्तेच्या मागे लागल्यामुळं काही आरोप होताना दिसत आहेत.

Balasaheb Patil vs BJP
सहकार विभागाचा 'पेनड्राईव्ह' देण्यानं फरक पडणार नाही : सहकारमंत्री पाटील

विरोधी पक्षानं आत्तापर्यंत महाविकास आघाडीचे सरकार पडण्यासाठीच्या अनेकदा तारखा दिल्या. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार भक्कम आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना नुकतीच दिलेली १० मार्च तारीख होवून नऊ दिवस झाले. मात्र, महाविकास आघाडी सरकार आजही भक्कम राहिलंय. हे लक्षात आल्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही २०२४ पर्यंत थांबतो आहोत, असं सांगितलंय. मात्र, आम्ही २०२४ च्या निवडणुकीलाही महाविकास आघाडी म्हणून दमदारपणे सामोरे जावू, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com