

Maharashtra Political Devlopments devendra fadanvis eknath shinde sunetra pawar
esakal
Maharashtra political appointments update : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन दीड वर्ष उलटले असले तरी प्रलंबित असलेल्या महामंडळावरील नियुक्त्यांना आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीतील पदाधिकारी आणि इच्छुक कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेल्या या नियुक्त्यांबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता असून, पुढील महिनाभरात महामंडळ वाटपाची अंतिम यादी जाहीर होऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रक्रिया त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे.