
महायुतीचे मंत्री वादात सापडत आहे. माणिकराव कोकाटे, योगेश कदम, संजय गायकवाड यांच्यानंतर आता महाराष्ट्राच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर एका व्हिडिओमुळे वादात सापडल्या आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, भाजप नेत्या एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान एका ग्राम अधिकाऱ्याला थप्पड मारण्याची धमकी देताना दिसत आहेत. सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांना कार्यक्रमात न आणल्याबद्दल त्यांना फटकारताना दिसत आहेत. यामुळे आता खळबळ उडाली आहे.