V. Shantaram Award : महेश मांजेरकरांना शांताराम जीवनगौरव, पांचाळेंना लता मंगेशकर सन्मान; अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे यांचा गौरव

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार मिळणार असून अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे व भीमराव पांचाळे यांनाही सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
V. Shantaram Award
V. Shantaram AwardSakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जाणारा यंदाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार नामवंत अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे. अभिनेते अनुपम खेर, अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेत्री काजोल देवगण आणि गझल गायक भीमराव पांचाळे यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com