सात दांपत्यांची ‘डीएनए’ चाचणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

सांगली - म्हैसाळ (ता. मिरज) येथील क्रूरकर्मा डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या दवाखान्यात गर्भपात केलेल्या सात दांपत्यांच्या ‘डीएनए’ चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले. मालगाव (ता. मिरज), मोरगाव (ता. कवठेमहाकाळ), शहापूर (इचलकरंजी), करवीर तालुका (कोल्हापूर), तेरवाड, गौरवाड, शिरढोण (ता. शिरोळ) येथील ही दांपत्ये आहेत. यापूर्वीही सात दांपत्यांचे ‘डीएनए’ चाचणीसाठी नमुने घेतले आहेत.

मणेराजुरी येथील स्वाती जमदाडे या गर्भवती महिलेचा बेकायदा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. या प्रकरणी पती प्रवीण जमदाडे, डॉ. खिद्रापुरेवर गुन्हा दाखल केला. पोलिस तपासात त्याने भ्रूणहत्या करून पुरलेले १९ भ्रूण ताब्यात घेतले. तपास करताना विजापूर, कागवाड येथील डॉक्‍टर, दलाल तसेच औषध पुरवणाऱ्यांसह १३ जणांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी प्राथमिक तपासात सात दांपत्यांचे ‘डीएनए’ चाचणीसाठी रक्ताचे नमुने घेतले होते. खिद्रापुरेच्या दवाखान्यात गर्भपात केलेल्या आणखी सात दांपत्यांची नावे पोलिस तपासात निष्पन्न झाली. त्यामुळे संबंधित सात दांपत्यांना पोलिसांनी बोलावून सांगलीतील शासकीय रुग्णालयात ‘डीएनए’ चाचणीसाठी रक्ताचे नमुने घेतले. संबंधित दांपत्ये मालगाव, मोरगाव, शहापूर, करवीर, तेरवाड, गौरवाड, शिरढोण येथील आहेत. डीएनए चाचणीसाठीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. या प्रकरणात आणखी काही संशयितांचा सहभाग असल्याची शक्‍यता असून, त्या दृष्टीने पोलिस तपास सुरू आहे. 

खिद्रापुरेसह १३ जण कळंब्यात
खिद्रापुरेसह १३ जणांना अटक केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सांगलीतील कारागृहात सर्वांना रवाना केले जाणार होते; परंतु सुरक्षेच्या कारणास्तव कारागृह प्रशासनाने सर्वांना अन्यत्र पाठवण्याची विनंती केली. त्यामुळे सर्वांना कळंबा येथील कारागृहात पाठवले आहे.

दोघांच्या जामिनावर आज सुनावणी

भ्रूणहत्या प्रकरणात अटकेत असलेला औषध वितरक भरत शोभाचंद गटागट (रा. माधवनगर) व कागवाडचा डॉ. श्रीहरी घोडके याने जामिनासाठी अर्ज केला आहे. जिल्हा न्यायालयात त्यावर उद्या (ता. ५) सुनावणी होणार आहे. यापूर्वी डॉ. रमेश देवगीकर (रा. विजापूर) याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

Web Title: maishal-case